लातूर, बीड जिल्ह्यांत दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

औराद शहाजानी - हनमंतवाडी (हलगरा, ता. निलंगा) येथील शेतकरी राजू शेषराव चव्हाण (वय ४०) यांनी सोमवारी (ता. ७) सायंकाळी सातच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बॅंकेचे २५ हजार, तर सोसायटीचे नऊ हजार रुपये कर्ज आहे. मुलगी, वडिलांच्या उपचारासाठी पैसे नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. त्यातच नोंदणी करूनही तूर खरेदी झाली नव्हती, असे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

शेतकऱ्याने घेतले विष
माजलगाव - तालुक्‍यातील निपाणी टाकळी येथील हनुमाननगर तांड्यावरील शेतकरी ताराचंद देवराव चव्हाण (वय ६०) यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. आठ) घडली.  निपाणी टाकळी येथील हनुमाननगर तांड्यावरील शेतकरी ताराचंद चव्हाण या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे सेवा सहकारी सोसायटीसह राष्ट्रीयीकृत बॅंक व खासगी सावकाराचे कर्ज आहे. शेतीवरील कर्ज फिटत नसल्याने तसेच शासनाच्या चुकीच्या कर्जमाफी धोरणाचाही वैताग आल्याने ताराचंद चव्हाण यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे.

Web Title: two farmer suicide