बीड जिल्ह्यामध्ये दोन शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

सिरसाळा (जि. बीड) - किल्ले धारूर आणि माजलगाव तालुक्‍यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सिरसाळा पोलिस ठाण्यात बुधवारी दोन्ही घटनांची नोंद नोंद झाली.

सिरसाळा (जि. बीड) - किल्ले धारूर आणि माजलगाव तालुक्‍यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सिरसाळा पोलिस ठाण्यात बुधवारी दोन्ही घटनांची नोंद नोंद झाली.

सततची नापिकी, कापसावरील बोंड अळी व कर्जाचा बोजा या चिंतेतून फकीर जवळा (ता. धारूर) येथील गोरख लहू कदम (वय 23) यांनी विष घेतले होते. उपचारादरम्यान सोमवारी (ता. 23) त्यांचा मृत्यू झाला. नापीक, कर्जामुळे विष घेतलेले शेतकरी भास्कर अंबादास सुरनर (वय 45) यांचे उपचारादरम्यान सोमवारी निधन झाले.

Web Title: two farmer suicide in beed district