दोन शेतकऱ्यांची जालन्यात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

जालना - जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. बेलगाव (ता. अंबड) येथील शेतकरी कैलास त्र्यंबक मोताळे (वय 45) यांनी घरी गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली. मांदळा (ता. घनसावंगी) येथील शेतकरी गोविंदराव साहेबराव धबडकर (45) यांनी शुक्रवारी (ता.28) विष प्राशन केले. त्यांना घनसावंगीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
Web Title: two farmer suicide in jalana