दोन शेतकऱ्यांची मराठवाड्यात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पाथरी (जि. परभणी) - सततच्या नापिकीला कंटाळून नागोराव संतोबा अंभोरे (वय 55) या शेतकऱ्याने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सरोळा बु. (ता. पाथरी) येथे रविवारी घडली. नागोराव अंभोरे यांच्या नावे दोन एकर शेती आहे. चार वर्षांपासूनच्या नापिकीमुळे बॅंकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी पाथरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत सिंदगी (ता. कळमनुरी) येथे शेतकरी गजानन तुकाराम मगर (वय 35) यांनी शनिवारी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बोंड अळीमुळे कापसाचे उत्पादन घटले, त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. याबाबत प्रसाद चिंतामणी मगर यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: two farmer suicidie