नांदेडमध्ये दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

नांदेडमध्ये दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

नांदेड - सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी माहूर आणि भोकर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

माहूर तालुक्‍यातील वानोळा येथील शेतकरी प्रकाश लोडबा चव्हाण (वय 45) यांच्या शेतात काही वर्षांपासून सतत नापिकी होत होती. नापिकी होत असल्याने घरगाडा चालविण्यासाठी त्याने बॅंकेचे कर्ज काढले होते. या कर्जाची परतफेड होत नव्हती. त्यांनी आपल्या घरातच सोमवारी आत्महत्या केली, तर दुसरी घटना भोकर तालुक्‍यातील गारगोटवाडी येथे घडली. गणेश मारुती जाधव (वय 65) यांच्या शेतात सतत नापिकी होत होती. त्यांच्यावरही कर्ज होते. त्यांनी कर्जाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com