दोघांवर प्राणघातक हल्ला, तेरा जणांविरूद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

हानेगांव (नांदेड) : शेतीच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला करून शेतावर उभ्या पिकातून ट्रक्टर घालून नासाडी करणाऱ्या तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मरखेल पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ही घटना देगलूर तालुक्यातील हानेगंव शिवारात सोमवारी (ता. 2) सकाळी नऊच्या सुमारास घडली. जखमी महाबोद्दीन पांढरे यांच्यावर मरखेल ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

शेतीच्या वादातून महाबोद्दीन पांढरे यांना कुऱ्हाडीने व काठीने बेदम मारहाण केली. त्याच्या मुलाच्या फिर्यादीवरुन नरसिंग गिरेवाड, बालाजी गिरेवाड, चंद्रकांत औटी, शरणु टोके, हुलराम हळणे, रमेश औटी, तानाजी औटी, सुभाष हळणे, नामदेव हुळणे, रामन्ना गड्डमवार यांच्यावर मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड यांनी भेट दिली. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तपास गुंगेवाड हे करीत आहेत. 

Web Title: Two fatal attacks, crime against thirteen people