फायरींगच्या दोन घटनांनी नांदेड पुन्हा हादरले

प्रल्हाद कांबळे 
मंगळवार, 9 एप्रिल 2019

नांदेड मध्ये घडलेल्या फायरींगच्या दोन घटनांमध्ये एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे.
 

नांदेड : लुटमारीच्या उद्देशाने अज्ञात दुचाकीस्वारांनी पिस्तुलमधून गोळी झाडून एकाचा खून तर दुसऱ्याला जखमी केले. या घटनेने नांदेड शहर हादरले असून पोलिस मारेकऱ्यांच्या शोधात लागले आहेत. या घटना सोमवारी (ता. 8) मध्यरात्री विद्यापीठ व बीडीडीएस कार्यलयासमोर घडल्या. मारेकऱ्यांनी पळविलेली चारचाकी गाडी अबचलनगर भागातून जप्त केली. यात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील शेख नजीब अब्दुल गफार यांचा मृत्यू झाला तर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील डॉक्टर सतीश गायकवाड हे जखमी झाले आहेत..

Web Title: Two firing incidents have happened in Nanded

टॅग्स