पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

ram kamble sandeep kharat
ram kamble sandeep kharat

घनसावंगी (जालना) :  पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील मंगुजळगाव (ता.घनसावंगी)  सोमवारी (२८ ऑक्टोबर) दुपारी घडली.  ऐन दिवाळी सणादरम्यान ही घटना घडल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात  येत  आहे.  

 मंगुजळगाव येथील संदीप रघुनाथ खरात (वय १५) व राम बापुराव कांबळे(वय १५)  हे दोन मित्र सोमवार दुपारी बारा वाजेच्या दरम्यान राणी उंचेगाव शिवारातील छोट्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात  बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.  दरम्यान, काही नागरीकांच्या  निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी दोघाचेही शव पाझर तलावाबाहेर काढले व त्यांनतर सदरील माहीती अंबड पोलीसांना देण्यात येऊन शवविच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्र राणी उंचेगाव येथे करण्यात येणार आले. ऐन दिवाळी सणातील पाडव्याच्या दिवशीच ही दु:खद घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com