लातूर : दोनशे मतदार अडकले तेरू नदीच्या पुरात

rain-latur.jpg
rain-latur.jpg

मुक्रमाबाद : येथून जवळच असलेल्या कलंबर येथील मतदान केंद्राअंतर्गत येत असलेल्या रामवाडी व भिमवाडी येथील मतदार  हे, मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यात व तालुक्यात रात्रभर पडलेल्या मुसळधार पाऊसामुळे तालुक्यातून वाहत असलेली तेरू नदी ही, मध्ये राञी पासून दुथडी भरून वाहत असल्यामुळे येथील दोनशे मतदार हे, मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे. 

नदीचा वाढता जोर व नदीच्या पाञाबाहेर तीनशे मिटरपेक्षा जास्त पाणी पसरले असल्यामुळे पाहून प्रशासनही हतबल झाल्याचे  दिसत असून, या पुरपरिस्थितीमुळे आम्ही मतदान कसे करायचे असा प्रश्न मतदार विचारत असून, प्रशासन व उमेदवार यावर काय भूमिका घेतात याकडे येथील मतदाराचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com