भोकरदनजवळ अपघातात दोन गंभीर जखमी

दीपक सोळंके
सोमवार, 30 एप्रिल 2018

सोनू रामराव शेळके (27) रा. प्रल्हादपुर ता. भोकरदन व रामेश्वर साहेबराव बरडे (23) रा. फत्तेपुर ता. भोकरदन असे जखमींचे नावे आहेत.

भोकरदन (जि. जालना) - भोकरदन जाफ्राबाद मुख्य रस्त्यावरील विरेगाव गावाजवळ एका अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात सोमवारी (ता. 30) सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडला.

सोनू रामराव शेळके (27) रा. प्रल्हादपुर ता. भोकरदन व रामेश्वर साहेबराव बरडे (23) रा. फत्तेपुर ता. भोकरदन असे जखमींचे नावे आहेत. नागरिकांनी दोनही जखमींना तत्काळ भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून दोघांनाही पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असून, जखमींपैकी सोनू शेळके याला अधिक मार असल्याने त्याची स्थिती नाजूक असल्याचे समजले.

अपघाताचा सिलसिला सुरूच..
दरम्यान भोकरदन- जाफ्राबाद मुख्य रस्त्यावर अपघाताचा सिलसिला सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांना प्राण गमवावे लागले. लग्न सराईमुळे रस्त्यावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, वाहने चालवितांना प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Two injured in Accident near bhokardan