ओमनी कार-दुचाकी अपघातात दोन जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

रामेश्वर नाथा गिते (वय ३० वर्षे) व नामदेव भाऊसाहेब गिते (वय २१ वर्षे, दोघे रा. देवगाव, ता. पैठण) हे दुचाकीवरून (एमएच २० डीपी ७७५७) आडुळ कडुन औरंगाबादकडे जात होते त्यावेळी औरंगाबादकडुन आडुळकडे भरधाव वेगाने येणार्‍या ओमनी कारने (एमएच २० ईई ६९६५) समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली.

पिंपळगाव - भरधाव ओमनी कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार (ता. २०) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव - पांढरी (ता. औरंगाबाद) फाट्यावर घडली. 

रामेश्वर नाथा गिते (वय ३० वर्षे) व नामदेव भाऊसाहेब गिते (वय २१ वर्षे, दोघे रा. देवगाव, ता. पैठण) हे दुचाकीवरून (एमएच २० डीपी ७७५७) आडुळ कडुन औरंगाबादकडे जात होते त्यावेळी औरंगाबादकडुन आडुळकडे भरधाव वेगाने येणार्‍या ओमनी कारने (एमएच २० ईई ६९६५) समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. त्यांना औरंगाबाद येथे उपचाराला पाठविण्यात आले आहे. 

Web Title: two injured near Aurangabad