जांभळाजवळील कार-ट्रकच्या धडकेत दोन ठार, दोघे गंभीर जखमी

किशोर पाटील
मंगळवार, 5 मार्च 2019

ही घटना मंगळवारी (ता. 5) सकाळी दहाच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की परिसरात मोठा आवाज आला व कारचा अक्षरश: चुराडा झाला. यामुळे मृत व जखमींची अद्यापही नावे कळू शकलेली नाहीत.

दौलताबाद :  औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील जांभळा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) गावाजवळ ट्रक (पीबी13 एएल 7471) व कार (एमएच 20 डीएफ  295) यांची समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील दोन ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले.

ही घटना मंगळवारी (ता. 5) सकाळी दहाच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की परिसरात मोठा आवाज आला व कारचा अक्षरश: चुराडा झाला. यामुळे मृत व जखमींची अद्यापही नावे कळू शकलेली नाहीत. या अपघातातील जखमींना ग्रामस्थांनी तात्काळ औरंगाबाद येथील घाटीत हलविले. मिटमिटा येथील चार जण जांभळाच्या दिशेने जात होते, तर पंजाब येथील ट्रक औरंगाबादच्या दिशेने जात होता. सदरील अपघात ओव्हरटेक करण्याच्या घाईत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

यावेळी घटनास्थळाला वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, निरीक्षक नाथा जाधव, दौलताबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विक्रम वडणे यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास दौलताबाद पोलिस करित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed and two seriously injured in a car accident near jambhla