मोटारींच्या धडकेत दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

आडूळ - दोन मोटारींच्‍या धडकेत सेवानिवृत्त फौजदार व चालक ठार, तर तीनजण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. नऊ) रात्री पावणेबाराच्या सुमारास औरंगाबाद-जालना रस्त्यावरील शेंद्रा (ता. औरंगाबाद) बसस्थानकावर घडली. निवृत्त पोलिस उपनिरीक्षक भावराव दगडू खार्डे (वय ६५, रा. जालना, ह.मु. कांचनवाडी, औरंगाबाद) व कारचालक शिवाजी दिनकर शिंदे (वय ३५, रा. रामनगर, जालना) अशी मृतांची नावे आहेत.

चिकलठाणा पोलिसांनी सांगितले, की भावराव खार्डे हे कुटुंबीयांसोबत त्यांच्या कारने (एमएच- २१, एएक्‍स- १९१) जालन्याहून औरंगाबादला जात असताना शेंद्रा बसस्थानकावर रात्री पावणेबाराच्या सुमारास ही धडक झाली. यात स्विफ्ट कारचा चुराडा होऊन त्यातील भावराव खार्डे व चालक शिवाजी शिंदे ठार झाले, तर भावराव यांची सून शारदा राजू खार्डे (वय ३०), नातू प्रथमेश (१२) व नात सिद्धेश्‍वरी (१५) हे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी जखमींना औरंगाबादच्या रुग्णालयात हलविले. पोलिस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सकू राठोड तपास करीत आहेत.

खार्डे कुटुंबीयांवर शोककळा

निवृत्त पोलिस उपनिरीक्षक भावराव खार्डे हे मूळचे जालना येथील असून, सध्या औरंगाबाद येथील कांचनवाडी येथे स्थायिक झाले आहेत. त्यांचा मुलगा राजू खार्डे हे बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक आहेत.

Web Title: Two killed in car accident