मंगल कार्यालयाची भिंत पडून बाप-लेक ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

गेवराई - वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मंगल कार्यालयाच्या व्यासपीठावरील शामीयानाची लोखंडी कमान भिंतीवर कोसळून त्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) तालुक्‍यातील मादळमोही येथे घडली. सुखदेव लिंबाजी चव्हाण (वय ६५, रा. चव्हाणवाडी, ता. बीड) व त्यांची विवाहित मुलगी कालिंदा नारायण गायकवाड (रा. ढाकलगाव, ता. अंबड, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत. 

मादळमोही येथील मुरलीधर रोमण यांची मुलगी अर्चना हिचा विवाह बीड येथील महेश घिगे यांचा मुलगा विशालसोबत होता. येथील युवराज मंगल कार्यालयात सकाळपासूनच तयारीची लगबग होती. दुपारी चारच्या सुमारास वादळी-वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यामध्ये मंगल कार्यालयाच्या व्यासपीठावरील देखावा पाठीमागील भिंतीवर कलल्याने भिंत कोसळली. पाठीमागे उभे असलेले सुखदेव चव्हाण व त्यांची मुलगी कालिंदा गायकवाड हे दोघे दबून ठार झाले. भिंतीखाली इतर नऊ जण अडकले होते. यामधील सत्यशीला घिगे यांची प्रकृती गंभीर आहे. 

Web Title: Two killed in wall collapse

टॅग्स