शिवाजीनगर येथील दोन मटका बुक्कीवर छापा

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 12 मार्च 2020

नांदेड शहराच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या दोन मटका बुक्कीवर शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने कारावई करत ११ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून नगदी व मोबाईल असा ५७ हजाराचा ऐवज जप्त केला. 

नांदेड : शिवजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या दोन मटका बुक्कीवर उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी नऊ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून ५७ हजार ४५० रुपयाचा ऐवज जपत केला. या सर्वांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहर व जिल्ह्यात मटका, जुगार हे अवैध धंदे बंद करण्याच्या सुचा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगरयांनी सर्व ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या. तरीही मटका सुरूच असल्याच्या तक्रारी श्री. मगर यांच्याकडे जात होत्या. त्यांनी पुन्हा उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांना सांगितले. यावरून त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांच्या पथकाला सतर्क केले. 

हेही वाचाआश्‍चर्यम्...! म्हैशीला जन्मला दोन तोंडासह विचित्र रेडकुस

जयभीमनगर व राजनगर भागातील नेहमीचे अड्डे 

श्री. वाहूळे यांना बुधवारी (ता. ११) सायंकाळच्या सुमारास शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीत जयभीमनगर नाल्याच्या बाजूला व राजनगर पाटीजवळ मटका बुकी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या दोन्ही ठिकाणी छापा टाकला. यावेळी एका मटका बुकीवरून नऊ तर दुसऱ्या बुकीवरून दोन अशा ११ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख व मोबाईल असा ५७ हजार ४५० रुपयाचा ऐवज जप्त केला. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या सर्व जुगाऱ्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एपीआय रवी वाहुळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकात पोलिस हवालदार संजय मुंडे, रामकिशन मोरे, लियाकत शेख, शिलराज ढवळे, राजकुमार डोंगरे, काकासाहेब जगताप आणि विशाल अटकरोरे यांचा सहभाग होता. 

हे आहेत जुगारी

राजनगर येथील मटका बुकीवरून विनोद सकत, संजय जाधव, अशोक भोळे, समीरखान पाशाखान, गोपाळ खाडे, भिमा धम्माकर, कबीर टेहरे, प्रकाश हनवते, अनिल गायकवाड यांना तर जयभीमनगर येतील बुकीवरुन अली बेग आणि दिनेश नरवाडे यांना अटक केली.  
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two matka bookies at Shivajinagar crime news nanded.