खंडणीप्रकरणी आणखी दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

लातूर - क्‍लासचालकांकडून 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी फरार असलेले दोघेजण स्वत:हून रविवारी पोलिस चौकीत हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली. सोमवारी (ता. 31) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

लातूर - क्‍लासचालकांकडून 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी फरार असलेले दोघेजण स्वत:हून रविवारी पोलिस चौकीत हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली. सोमवारी (ता. 31) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

शकील ऊर्फ सज्जन शेख व महावीर तुकाराम कांबळे अशी त्यांची नावे आहेत. ते शिवाजीनगर पोलिस चौकीत रविवारी सायंकाळी हजर झाले. या दोघांसह कॉंग्रेस नगरसेवक सचिन मस्के अशा तिघांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली. अद्याप चार जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. विजयसिंह हर्षप्रतापसिंह परिहार आणि राजीवकुमार रमाकांत तिवारी हे दोघेही अध्ययन नावाने सिग्नल कॅम्प भागात क्‍लास चालवतात. त्यांना 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याने सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यात या तिघांची नावे आहेत.

Web Title: Two more arrested in the ransom case Crime