उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाचे दोन बळी, ३१ नवीन रुग्णांची भर

तानाजी जाधवर
Friday, 18 December 2020

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता. १८) कोरोनाचे ३१ नवीन रुग्ण सापडले असून, दोन जणांचा बळी घेतला आहे. दिवसभरात सात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

उस्मानाबाद  : जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता. १८) कोरोनाचे ३१ नवीन रुग्ण सापडले असून, दोन जणांचा बळी घेतला आहे. दिवसभरात सात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात एकूण १५ हजार ४२६ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील बरे होण्याचे प्रमाण पाहिले तर ९५.६३ टक्के इतके झाले आहे. तर जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण ३.४७ टक्के एवढा हे.
एक लाख दोन ७४७ इतक्या संशयिताची तपासणी केल्यानंतर १६ हजार १३१ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

 

 

कोरोना होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण १५.७० टक्के इतके आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालामध्ये ३१ जणांना लागण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये उस्मानाबाद चार, तुळजापूर दोन, उमरगा चार, लोहारा तीन, कळंब एक, वाशी तीन, भूम एक व परंडा १३ अशी तालुकानिहाय वाढलेल्या रुग्णांची संख्या आहे. त्यातील तीन जणांना परजिल्ह्यात बाधा झाल्याचे दिसून येत आहे. १३५ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली होती. त्यातील १८ लोकांचे स्वॅब पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. २१७ लोकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली.

 

 

त्यातील दहाजणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. वाशी येथील ९२ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे; तसेच परंडा तालुक्यातील राजुरी गावच्या ६० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

 

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकूण रुग्णसंख्या ः १६,१३१
बरे झालेले रुग्ण ः १५,४२६
उपचाराखालील रुग्ण ः १४५
एकूण मृत्यू ः ५६०

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Patient Died, Covid 31 Cases Reported Osmanabad News