भिंत कोसळून दोन जण ठार

उमेश वाघमारे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

जालना : शहरातील जुना मोंढा परिसरातील जीर्ण झालेल्या इमारतीची भिंत कोसळल्याने ढिगार्‍याखाली दबून दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (ता.9) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

जालना : शहरातील जुना मोंढा परिसरातील जीर्ण झालेल्या इमारतीची भिंत कोसळल्याने ढिगार्‍याखाली दबून दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (ता.9) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

शहरातील जुना मोंढा परिसरातील जीर्ण झालेल्या इमारती शेजारी एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. या बांधकामादरम्यान शेजारील जीर्ण झालेल्या इमारतीची भिंत अचानक कोसळली. भिंत कोसळल्याने ढिगार्‍याखाली दबून प्रकाश लक्ष्मण खंदारे (वय 45, रा. गोंदेगाव, ता. जालना), काकासाहेब देवराव कबाडे (वय 50, रा. हिवरा राळा, ता. बदनापुर) या दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर सुधाकर नामदेव लहाने (वय 34), शिवाजी चोखाजी लहाने (वय 30, दोघे रा. उंब्रज, ता. जालना), बद्री वाकुडे (वय 40, रा. गुंडेवाडी, ता. जालना) यांच्यासह अन्य एक जण जखमी झाला आहे. जखमीपैकी दोघांवर शासकीय तर दोघांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन, अग्निशामन दल, नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तत्काळ बचाव कार्यात तत्काळ सुरू केले व ढिगार्‍या खाली अडकलेल्या मृतासह जखमींना बाहेर काढण्यात आले.

Web Title: Two people killed in wall collapse