अज्ञात वाहनाच्या धडकेत माजलगावला दोन दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील (क्रमांक एम.एच. २१ ए.सी. ८८७६) दोघेजण जागीच ठार झाले.
 

माजलगाव(बीड): एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील (क्रमांक एम.एच. २१ ए.सी. ८८७६) दोघेजण जागीच ठार झाले.

ही घटना रविवारी (ता. २४) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महारागावरील नवा मोंढा जवळ घडली. शेख बाशा शेख वजीर (रा. गोळेगाव, जिल्हा जालना) व  शेख आयुब काझी (रा. कडेगाव, जि. कोल्हापूर) अशी अपघातात झालेल्यांची नावे आहेत.

शेख बाशा व शेख आयुब हे दोघे राष्ट्रीय महामार्गावरून गेवराईच्या दिशेने जात असताना अज्ञात वाहनाने माठीमागून दुचाकीला धडक देऊन नुघून गेले. यात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातात एवढा भीषण होता की यात दुचाकीस्वारांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. एकाच्या खिशातील आधार कार्डावरून त्यांची ओळख पटली आहे. 
 

Web Title: Two person killed in accident in majalgoan dist beed