कार-कंटेनरचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर, दोघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 19 डिसेंबर 2018

दौलताबाद : दौलताबाद (ता.औरंगाबाद) येथे मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवीण हॉटेलजवळ बुधवारी (ता.19) कार व कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला. यामध्ये पराग रामचंद्र कुलकर्णी (वय 32, रा. पडेगाव, औरंगाबाद) व अरुण छगन काकडे (वय 26, नारेगाव, औरंगाबाद) असे आहेत. 

कारमध्ये (एमएच. 23 एडी 1654) बसून पराग व अरुण हे बुधवारी नाशिककडून औरंगाबादकडे येत असताना धुळेला जाणारा कंटेनर (एनएल 01 एसी0506) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. कार कंटेनरमध्ये जाऊन अडकली. त्यामध्ये पराग व त्याचा मित्र अरुण होते. या घटनेची माहिती महामार्ग पोलिस हेडकॉन्स्टेबल डेंगल, जाधव, अण्णा खजिनदार व दौलताबाद पोलिस ठाण्याला मिळताच सहायक पोलिस निरीक्षक रफीक, ज्ञानेश्वर साळवे, खाजेकर, सचिन त्रिभुवन घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांना बाहेर काढून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Two Persons died in a car container accident in Daulatabad