नांदेड शहरात २५ पोलिस चौकी सुरू 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

नांदेड : शहरातील जनतेला अडचणीच्या वेळी २४ तास पोलिस सेवा देण्यासाठी शहरातील सहा पोलिस ठाण्यांतर्गत २५ पोलिस चौकी कार्यान्वीत केल्या आहेत. यामुळे आता शहरातील झोपडपट्टी दादा यांच्यासह गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची नजर राहणार आहे. तसेच परिसरात काही अनुचीत प्रकार घडला तर लगेच चौकीतील पोलिसांची मदत मिळणार आहे. अशी माहिती पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 

नांदेड : शहरातील जनतेला अडचणीच्या वेळी २४ तास पोलिस सेवा देण्यासाठी शहरातील सहा पोलिस ठाण्यांतर्गत २५ पोलिस चौकी कार्यान्वीत केल्या आहेत. यामुळे आता शहरातील झोपडपट्टी दादा यांच्यासह गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची नजर राहणार आहे. तसेच परिसरात काही अनुचीत प्रकार घडला तर लगेच चौकीतील पोलिसांची मदत मिळणार आहे. अशी माहिती पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
तत्तकालीन पोलिस अधिक्षक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी शहरातील सहा पोलिस ठाण्यांतर्गत पोलिस चौकी सुरू केल्या होत्या. परंतु दरम्यानच्या काळात या चौकी बंद पडल्या. त्यामुळे त्या- त्या परिसरात गुन्हेगारांचे डोके वर निघाले. यावर प्रतिबंध घालण्यासाठी व नांदेडकरांच्या मागणीनुसार पुन्हा या चौकींचे पुनर्जीवन करण्यात आले. नांदेड शहरात स्ट्रीट पोलिसींग सुरू केली असून आता या पुढे रस्त्यावर पोलिस दिसणार आहे. या सोबतच काही नविन चौकी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे श्री. मगर यांनी सांगितले.

या चौकीमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक किंवा फौजदार दर्जाचा अधिकारी असून त्यांच्या अधिनस्त पोलिस आणि गृहरक्षक दलाचे कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. पोलिस चौकी बंद दिसल्यास नागरिकांनी थेट मला किंवा अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के आणि धनंजय पाटील यांच्यासह ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले. यासाठी तीस अधिकारी व १४० पोलिस कर्मचारी कार्यान्वीत केले आहे. 

चौकीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कर्तव्य

ँ शहरातील घरफोड्या, चोऱ्या, चैन स्नॅचींग, गंभीर स्वरुपाचे गुन्हे यावर प्रतिबंध घालतील. तसेच तलवारी, खंजर वापरणाऱ्या गुंडावर कार्यवाही करतील. तसेच हद्दीतील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटण करतील. 
ँ चौकी हद्दीतील प्रतिष्ठीत व्यक्ती, जनतेसोबत संपर्क वाढवून जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही. 
ँ चौकीतील अधिकारी व कर्मचारी यांना दाखल गुन्ह्याचे तपासातील कागदपत्रे, पंचनामे व इतर गोष्टीमध्ये सुरळीतपणा येईल. तसेच गुन्हे निष्पन्न होण्यास मदत होईल. चौकी परिसरातील गुंडागर्दी, भाईगिरी करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहेत. 
ँ हद्दीतील शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी या ठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचारी हे भेट देऊन नागरिकांना धिर देतील. यामुळे छेडछाडीचे प्रमाण कमी होणार.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two police posts started in Nanded city