पेट्रोलपंपावरुन पैसे चोरणाऱ्यांना औरंगाबादेतून अटक

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 23 एप्रिल 2019

नांदेड - सिलींगचे काम करण्यासाठी आलेल्या दोघांनी सगनमत करून पेट्रोलपंपावरील गल्ला फोडून साडेचार लाख लंपास केले होते. हा प्रकार ता. १६ ते १७ एप्रीलच्या दरम्यान गौरी गोविंद पेट्रोलपंप, भोकर येथे घडला होता. यातील दोन्ही चोरटे भोकर पोलिसांनी औरंगाबादमधून मुद्देमालासह अटक केले. 

भोकर ते किनवट रस्त्यावर साईनाथ गोविंदराव कोंडलवार यांच्या मालकीचा गौरी गोविंद नावाचा पेट्रोलपंप आहे. त्यांनी मंगळवारी (ता. १६) रात्री दिवसभराचा गल्ला जमा झालेला आपल्या कार्यालयात गल्ल्यात जमा ठेवला. कुलूप लावून ते निघून गेले. याच पंपावर औरंगाबाद येथील श्रीपाद अरूण कुलकर्णी आणि शेषराव शिवाजी इंगळे हे सिलींगचे काम करत होते. पेट्रोलपंप मालक घरी जाताच या दोघांनी संगनमत करून गल्ला फोडून चार लाख ५५ हजार रुपये लंपास केले. बुधवारी (ता. १७) सकाळी दहा वाजता मालक श्री. कोंडलवार हे पंपावर आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. 

दरम्यान त्यांचा अपघात झाल्याने ते रूग्णालयात होते. या धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांनी सोमवारी (ता. २२) रात्री भोकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी वरील दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल लोकेशन मिळवत पोलिस पथक औरंगाबाद शहरात दाखल झाली. औरंगाबादच्या कन्नड परिसरातून श्रीपाद कुलकर्णी आणि शेषराव इंगळे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कमही पोलिसांनी जप्त करून त्यांना भोकरला आणण्यात आले. कामासाठी जातव त्याठिकाणी चोरी करीत असल्याचे समोर आले आहे.

Web Title: two robbers arrested from aurangabad