पोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार 

पोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले. त्यांना नांदेडला आणल्यानंतर लॉकअपजवळ त्यांनी पोलिसांना गुंगारा देऊन सोमवारी (ता. २०) पसार झाले. या प्रकरणी वजिराबाद ठाण्यात दोन सख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चित्तरंजन ढेमकेवाड हे आपल्या पथकासह अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यासाठी पुणे येथे गेले होते. मोठ्या शिताफीने व धाडसाने त्यांनी पुणे येथून राजू देवराव राऊत आणि सुरज देवराव राऊत दोघे (रा. बेलानगर, नांदेड) यांना अटक केली. त्यांना भाग्यनगर ठाण्यात आणण्यात आले.

 दोन्ही आरोपींचा भाऊ पोलिस कोठडीत अगोदरच होता. या दोघांना वजिराबाद लॉकअपमध्ये टाकण्यासाठी  ढेमकेवाड हे सोमवारी (ता. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास घेऊन गेले. परंतु यातील राजू राऊत याने मला मळमळ करीत आहे, उलटी होण्याची शक्यता असल्याने त्याला पोलिस वाहनातून खाली उतरविले. परंतु पोलिसांच्या हाताला झटका देऊन तो पुढे पळाला. याचा फायदा घेऊन सुरज राऊतही त्याच्या मागोमाग पळाला. दोघांचा पाठलाग केला मात्र ते सापडले नाही. फौजदार चित्तरंजन ढेमकेवाड यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद ठाण्यात या दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रांत हराळे हे करीत आहेत.  

Web Title: two robbers run away by fooling police