डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहिमेतून दोन हजार टन कचरा जमा 

प्रकाश बनकर
रविवार, 12 मे 2019

  • डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठान अंतर्गत स्वच्छता मोहिम
  • सात जिल्ह्यातील 35 हजार स्वयंसवेकांनी घेतला सहभाग 
  • ​शहरातील 33 मार्गावर ही 165 किलोमीटर दुतर्फा मोहिम

औरंगाबाद : राज्याचे स्वच्छता दुत असलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठान अंतर्गत रविवारी (ता. 12) औरंगाबादेत महास्वच्छता अभियान राबवण्यिात आले. या अभियानात राज्यातील सात जिल्ह्यातून 35 हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेत शहर स्वच्छ केले. या मोहिमेतून जवळपास दोन हजार टन कचरा जमा झाला आहे. सामाजिकभान ठेवत निस्वार्थ भावाने स्वयंसेवकांनी या मोहिमेत हजेरी लावली. 

garbage

डोक्‍यावर गांधी टोपी, खिशाला स्वयंसेवकांचा बिला आणि हातात, झाडू आणि टोपली घेऊन या स्वयंसेवकांनी सकाळी साडे सहा वाजेपासून शहरातील 33 मार्गावर ही 165 किलोमीटर दुतर्फा मोहिम राबविली. क्रांती चौकात खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाडू मारून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.यावेळी महापौर नंदकुमार घोडले, प्रतिष्ठानचे ऍड. उमेश भोजने, नेताजी भोसले, सूभाष पाटील, अॅड. सोपान शिंदे, अमोल उबरहंडे, योगेश सोनवणे, गणेश बोधे, पंकज धुमाळ यांची प्रमुख उपस्थिीत होती. अनोख्या पद्धतीने मनात कोणताही अहंमभाव न आणात आपल्या दिलेल्या मार्गावर या स्वयंसेवकांनी प्रामाणिकपणे स्वच्छता राबवली. यात शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. यासह 40 हून अधिक स्माशन भूमित पहिल्यांदाच स्वच्छता राबविण्यात आली आहे. या मोहिमेचा समारोप शहानुरमिया दर्गा येथील श्रीहरी पव्हेलियन येथे सकाळी 11 वाजता खासदार चंद्रकांत खैरे, महापौरे नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, प्रतिष्ठानच्या भोजने 20 हजार स्वयंसेवकांच्या उपस्थितीत झाला. 

-शहरातील 33 मार्ग 
-33 टिम, प्रत्येक टिममध्ये एक हजार ते बारोश स्वयंसेवक 
-105 सरकारी कार्यालयांची स्वच्छता 
-40 स्मशानभूमीची स्वच्छता 
-165 किलोमीटरच्या दुतर्फा भागात राबवली मोहिम 
-घरून चटणी-भाकर सोबत आणली. 
-सोबत स्वच्छता मोहिमे साहित्य. 
- स्वखर्चाने आले स्वयंसेवक 
- निस्वार्थ भावाने केली सेवा

garbage


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two thousand tonnes of garbage collection from cleanliness campaign at aurangabad