esakal | बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या भावावर काळानेच घातला घाला, बीड जिल्ह्यातील घटना 
sakal

बोलून बातमी शोधा

beed accident.jpg

दोन दुचाकीची समोरासमोर धडक 

बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या भावावर काळानेच घातला घाला, बीड जिल्ह्यातील घटना 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : अपघातात जखमी झालेल्या बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या भावावर काळाने घाला घातला. दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री राक्षसभुवन फाटा (ता. गेवराई) येथे घडली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शिवराज बालासाहेब सावंत (वय १९ वर्षे, रा. रांजणी, ता. गेवराई) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या या अपघातात त्याचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जण जखमी झाल्याची घटना रात्री साडे नऊ वाजता राक्षसभुवन फाटा येथे घडली. रांजणी येथील शिवराज सावंत याच्या चुलत बहिणीचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला. तिच्यावर औरंगाबादेत उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जखमी बहिणीला भेटण्यासाठी शिवराज सावंत, योगेश सावंत व विजय सावंत हे शुक्रवारी सायंकाळी रांजणीहून दुचाकीने औरंगाबादला निघाले. रात्री साडे नऊ वाजता राक्षसभुवन फाट्यावर त्यांच्या दुचाकीला अन्य एका दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात शिवराज बालासाहेब सावंत हा जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेले योगेश सावंत आणि विजय सावंत हे जखमी झाले आहेत. शिवराज ज्या वन - वे रस्त्याने जात होता त्याच रस्त्याने समोरून विरुद्ध दिशेने अन्य दुचाकी भरधाव वेगाने आली. त्यामुळे हा अपघात झाला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)