आयशरच्या धडकेत गंगापुरात दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

गंगापूर-औरंगाबाद रस्त्यावर आयशर व मोटारसायकलच्या अपघातात जखमी झालेल्या पुरी (ता. गंगापूर) येथील गणेश एकनाथ पाठे (वय 28) या तरुणाचा उपचारादरम्यान खासगी दवाखान्यामध्ये रविवारी (ता. आठ) मृत्यू झाला. ते येथील पाहुण्यांना भेटून मोटरसायकलवर (एमएच- 20, डीएन- 5151) औरंगाबादकडे जात असताना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

गंगापूर (जि.औरंगाबाद) : गंगापूर-औरंगाबाद रस्त्यावर आयशर व मोटारसायकलच्या अपघातात जखमी झालेल्या पुरी (ता. गंगापूर) येथील गणेश एकनाथ पाठे (वय 28) या तरुणाचा उपचारादरम्यान खासगी दवाखान्यामध्ये रविवारी (ता. आठ) मृत्यू झाला. ते येथील पाहुण्यांना भेटून मोटरसायकलवर (एमएच- 20, डीएन- 5151) औरंगाबादकडे जात असताना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

आयशर (एमएच- 04, एफयू- 6905) निष्काळजीपणे भरधाव वेगाने गाडी चालून मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात गणेश पाठे यांच्या डोक्‍याला जबर मार लागला. नागरिकांनी जखमी गणेश पाठे यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार अर्जुन चौधर हे करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two wheeler Rider Died In Accident