परळी तालुक्यातील दोन महिला भाविक अपघातात ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

जनाबाई अनंतराव साबळे (वय 60) व सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय 60) (दोघीही रा. जलालपुर, ता. परळी) अशी अपघातात ठार झालेल्या महिला वारकऱ्यांची नावे आहेत.

बीड - 15 दिवसांपूर्वीच आषाढी वारीसाठी गेलेल्या परळी तालुक्यातील दोन वारकरी महिलांचा भरधाव वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात बुधवारी (ता. चार) पहाटे पुण्यातील भोसरी (मोशी) येथे मृत्यू झाला.

जनाबाई अनंतराव साबळे (वय 60) व सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय 60) (दोघीही रा. जलालपुर, ता. परळी) अशी अपघातात ठार झालेल्या महिला वारकऱ्यांची नावे आहेत. या दोघी पंधरा दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथून आषाढी वारीसाठी आळंदीला गेल्या होत्या. त्यांच्या पालखीचा मंगळवार रात्रीचा मुक्काम भोसरी येथे होता. बुधवारी सकाळी पहाटे रस्ता ओलांडत असतांना भोसरी (मोशी) येथे त्यांना एका ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Two women devotees killed in Parli taluka