नांदेडजवळ अपघातात दोघे जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

आज (मंगळवारी) सकाळी पाच वाजता ही घटना घडली. दाभड (जि.नांदेड) येथील सत्यगणपतीला दर्शनासाठी हे दोघे जात असल्याचे समजते.

नांदेड :  शहराजवळील अर्धापूर रस्त्यावर आसना बायपास पुलावर दुचाकी ट्रक अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच चिरडून ठार झाले.

आज (मंगळवारी) सकाळी पाच वाजता ही घटना घडली. दाभड (जि.नांदेड) येथील सत्यगणपतीला दर्शनासाठी हे दोघे जात असल्याचे समजते.

वरील अपघातात मरण पावलेल्या तरूणांची नावे गोविंद धोंडिबा करडीले (वय 19 ) आणि साईनाथ उर्फ सुनिल गंगाराम मस्के (वय 18 ) दोघे रा. नागापूर ता नांदेड अशी आहेत. अपघातातील दुचाकीचा क्रमांक एमएच 26- बीएफ - 2007 असा आहे..

Web Title: two youth dead in accdent Nanded