लोअर दूधना धरणात बूडून दोन युवकांचा मृत्यु

विलास शिंदे
सोमवार, 2 जुलै 2018

सेलू : तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्पाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या सेलू येथिल दोन युवकांचा पाण्यात बुडून दूर्देवी मृत्यु झाल्याची घटना सोमवारी (ता.२) रोजी दूपारी आडीजच्या सुमारास घडली. दरम्यान मागील चार महिण्यातील ही चौथी घटना असल्याने धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे.

सेलू येथिल डॉ. झाकिर हूसेन नगरातील सहा मिञ व त्यांच्या कुटूंबातील काही सदस्य लोअर दूधना प्रकल्पाचा परिसर पाहण्यासाठी सोमवारी दूपारी दोनच्या सुमारास गेले होते. सर्वांनी एकञ डब्बा पार्टी केल्यानंतर सय्यद अमन सय्यद उस्मान (वय १८) व शेख जुनेद शेख सलिम (वय १७) हे दोघे फेर फटका मारून येतो असे सांगुन वाकडी शिवारातील जलाशयात पोहण्यासाठी उतरले. सय्यद अमन सय्यद उस्मान याला धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला त्याच्या सोबत असलेला शेख जुनेदने त्यास वाचविण्यासाठी प्रयत्न केले.

परंतु यात दोघांचाही पाण्यात बूडून दूर्देवी मृत्यु झाला. त्यांच्या सोबतचे इतर मिञ व कुटूंबियांनी ही घटना कळाल्यानंतर आरडा ओरड केली. त्यानंतर तेथिल मच्छिमारांनी दोन ते आडीच तासाच्या अथक परिश्रमाने दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. घटनास्थळी परतूर पोलिसांनी धाव घेवून पंचनामा केला. सेलू येथिल उपजिल्हा रूग्णालयात मृतदेहाची उतरिय तपासणी करण्यात आल्यानंतर दोघांचेही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधिन केले.

Web Title: Two youths die after lying in dam