उदगीर-परळी रेल्वेमार्ग नांदेडला जोडणार - मोतीलाल डोईजोडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

उदगीर - उदगीर-परळी हा रेल्वेमार्ग स्थापनेपासून आंध्र प्रदेशातील सिंकदराबाद येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागांतर्गत जोडण्यात आला आहे. महाराष्ट्रातील उदगीर ते परळी रेल्वे मार्ग हा दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागास जोडण्याची अनेक वर्षांपासून या भागातील प्रवाशांची मागणी होती. रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य करीत नांदेड विभागाशी जोडण्याचा निर्णय घेतल्याचे दक्षिण मध्य रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले.

उदगीर ते परळी रेल्वे मार्ग हा दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागांतर्गत येत असल्याने भाषिक द्वेषामुळे महाराष्ट्रातील रेल्वेचा विकास होऊ शकला नाही, असा आरोप वारंवार या भागातील प्रवाशांनी केला आहे. महाराष्ट्रातील रेल्वेच्या विकासासाठी हा रेल्वे मार्ग दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाशी जोडल्यास त्याचा फायदा या भागाला होणार असल्याने अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. 

यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा केला होता. या मागणीनुसार दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने खानापूर जंक्‍शन, भालकी, उदगीर, लातूर रोड ते परळी वैजनाथपर्यंतचा १६२ किलोमीटरचा रेल्वेमार्ग नांदेड विभागास जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मार्चनंतर होणार असून मराठवाड्यातील रेल्वेचा विकास होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्‍वास डोईजोडे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील रेल्वेच्या विकासासाठी राज्यातील २३ खासदार व ६ आमदारांच्या शिफारशींच्या माध्यमातून मराठवाडा रेल्वे महासंघाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठवाडा व विदर्भाच्या रेल्वे विकासासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती करावी, अशी मागणी केल्याचे दक्षिण मध्य रेल्वेचे सल्लागार सदस्य डोईजोडे यांनी सांगितले.

Web Title: uadgir-parli railway route connected to nanded