अन् उदयनराजेंना गहिवरुन आले !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

परळी येथे माजी केंद्रिय मंत्री गोपीनाथ मुंडें यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उदयनराजे भोसले बोलत असताना त्यांना गोपिनाथ मुंडेच्या आठवणीने गहिवरुन आले. 

बीड - परळी येथे माजी केंद्रिय मंत्री गोपीनाथ मुंडें यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उदयनराजे भोसले बोलत असताना त्यांना गोपिनाथ मुंडेच्या आठवणीने गहिवरुन आले. 

गोपीनाथ मुंडे हे माझ्यासाठी मित्र आणि मार्गदर्शक होते. माझ्या वडिलानंतर वडिलकीच्या नात्याने ज्यांनी मला जवळ केले त्यात गोपीनाथ मुंडे हे एक होते, अशी आठवण उदयनराजेंनी सांगितली. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी उदयनराजे अत्यंत भावूक झाले होते. त्यांच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता. 

मुंडे साहेबांची आठवण येत नाही, असा एक दिवसही जात नाही. अपघात होण्यापूर्वी दोन तारखेला मी दिल्लीत होतो. सकाळी कोणत्याही परिस्थितीत मुंडे साहेबांची भेट घ्यायची ठरली. सकाळी फोन लावला तर ते विमानतळाकडे चालल्याचे समजले. म्हणून बीडवरून परतल्यानंतर भेटायचे ठरले. पण त्यानंतर ५ ते ७ मिनिटांत हा प्रकार घडला. त्यांनी सर्वसाधारण माणसाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. कष्टकऱ्यांचे कसे भले होईल हे त्यांनी पाहिले, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले.

Web Title: udayanraje news in parali beed