मग उपग्रहालाच मुख्यमंत्री का बनवत नाही- उध्दव ठाकरे

मग उपग्रहालाच मुख्यमंत्री का बनवत नाही- उध्दव ठाकरे

लातूर- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारवर टीकेचे जबरदस्त आसूड ओढले. लातूरातील मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. गटप्रमुखांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर कडाडून टिकास्त्र सोडले राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी होणाऱ्या विलंबाबद्दल जाब विचारला. दुष्काळ जाहीर करण्यासाठी पंचांगाची वाट पाहावी लागते का? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.

राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी उपग्रहामार्फत करणार असल्याच्या वृत्ताचा धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळे काही उपग्रहावरूनच कळत असेल तर मग उपग्रहालाच मुख्यमंत्री का बनवत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. दुष्काळाचा प्रश्न राज्यात गंभीर बनत चालला असल्याने उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रामुख्याने हात घातला.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना शहरात 15 दिवसांतून एकदा पाणी यायचे आताही परिस्थिती तीच आहे मग बदलले काय असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. नैसर्गिक दुष्काळ दूर करण्यासोबतच लातूर जिल्ह्यातील राजकीय दुष्काळही संपवण्यासाठी कामाला लागण्याचे आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. सरकारच्या अनेक योजना बंद पडतायत, लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला? तुमच्या फसव्या योजनांचा फक्त पाऊस पडला. फसव्या योजनांच्या पावसाने पाणी येत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी साई समाधी शताब्दी सोहळ्यासाठी शिर्डीत आले होते. यावेळी त्यांनी दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले मात्र आधी दुष्काळ जाहीर तरी करा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com