उध्दव ठाकरेंनी करावा महाराष्ट्र भाजपमुक्त : जोगेंद्र कवाडे 

योगेश पायघन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद : केंद्रातील भाजपच्या भस्मासुराला टक्कर देणे हे मोठे धाडसाचे काम आहे. शिवसेनेने हे धाडस दाखवले. त्यामुळे शिवसेना भाजपपासून मुक्त झाला. आता उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे आणि राज्याला भाजपमुक्त करावे असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे. 

औरंगाबाद : केंद्रातील भाजपच्या भस्मासुराला टक्कर देणे हे मोठे धाडसाचे काम आहे. शिवसेनेने हे धाडस दाखवले. त्यामुळे शिवसेना भाजपपासून मुक्त झाला. आता उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे आणि राज्याला भाजपमुक्त करावे असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे. 

Image result for jogendra kawade

राज्यातील बदलती सत्ता समीकरणे आणि त्यातून नव्याने आकारास येणारी महाशिवआघाडी या पार्श्‍वभूमीवर खाजगी कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले जागेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलतांना आपली भूमिका मांडली. कवाडे म्हणाले, केंद्रातील भाजपच्या भस्मासुराला टक्कर देणे हे मोठे धाडसाचे काम आहे, शिवसेनेने हे धाडस दाखवले आहे. आता शिवसेनेने जशी मुक्ती मिळवली, तशी महाराष्ट्राला देखील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपपासून मुक्ती मिळवून द्यावी. उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याला कुणाचाही विरोध नाही, कॉंग्रेसनेही त्याला विरोध केलेला नाही. कारण शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असला तरी तो आता महाराष्ट्रवादी झाला आहे.

Image result for jogendra kawade

शेतकऱ्यांच्या हितासाठी...

शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत लवकर आणि स्थिर सरकार बनवावे. पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तरी हरकत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरीही अडचण नाही. कॉंग्रेसनेही याबाबत अशी कोणतीही अट ठेवली नसल्याचा दावाही कवाडे यांनी यावेळी केला. 

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी-कॉंग्रेसने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याने अनेकांनी आता तुम्ही हिंदुत्ववादी पक्षांसोबत जाणार का? असा सूर आळवायला सुरूवात केली आहे.

शिवसेना महाराष्ट्रवादी झाला आहे 

पण शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असला तरी आता तो महाराष्ट्रवादी झाला आहे, आणि वैचारीक परिवर्तनातून सत्ता मिळवता येते. त्यामुळेच शिवसेनेसोबत देखील राज्याला पाच वर्ष स्थिर सरकार देता येईल असा विश्‍वास व्यक्त करतांनाच आम्हालाही सत्तेत योग्य वाटा मिळायला हवा अशी अपेक्षा कवाडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - राजकीय चर्चा गेली हमरीतुमरीवर, चावा घेऊन तोडला मित्राचा कान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray Should Lead for BJP Free Maharashtra : Jogendra Kawade