esakal | उदगीरात आज सात रूग्ण वाढले, पोलीस निरीक्षकांचे अहवाल निगेटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus image.jpg

शहर व परिसरात काल दिवसभर पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वॅब तपासणीच्या अहवालाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या दोन पोलीस निरीक्षकासह ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी पल्लेवाड व श्री सिंगणकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

उदगीरात आज सात रूग्ण वाढले, पोलीस निरीक्षकांचे अहवाल निगेटिव्ह 

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर : येथील कोरोना रुग्णालयात सोमवारी (ता.२७) रोजी रात्री उशिरा पुन्हा सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत चव्हाण व ग्रामीणचे निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
शहर व परिसरात काल दिवसभर पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वॅब तपासणीच्या अहवालाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या दोन पोलीस निरीक्षकासह ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी पल्लेवाड व श्री सिंगणकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या मुळे उदगीरची वाटचाल आता त्रिशतकाकडे सुरू झाली असून एकूण रुग्ण संख्येचा आकडा २६९ वर पोहोचला आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना बळीमुळे उदगीर शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. येथील कोविड रुग्णालयात दररोज बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी जेवढे कोरोणाने मृत्यू होत आहेत तेवढेच सारी रोगांने होत आहेत. त्यामुळे कोवीड बरोबरच सारी चाही धोका निर्माण झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्युचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. येथील रुग्णालयात मुखेड जळकोट देवनी अहमदपूर या भागातील रुग्ण दगावत असल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक बनले आहे. दररोज नवीन संपर्काचे संदर्भच बदलत असलेले रुग्ण दाखल होत असल्याने आरोग्य यंत्रणानाही चकित झाली आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात पुन्हा सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तोडचिर तीन, सामान्य रुग्णालयाच्या जवळ एक, गटसाधन केंद्र पाठीमागे एक, देवणी एक, तोरना (कर्नाटक) एक अशा सात नवीन रूग्णाची नोंद झाली आहे.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

सद्या येथील कोरोना रुग्णालयात उदगीर २६८, जळकोट ३, निलंगा २, अहमदपूर ६, मुंबई ३, चाकूर ४, हैदराबाद २, मुखेड ४, देवणी ५, बिदर २, पुणे १ अशा कोरोनाची बाधा झालेल्या २९२ रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी २१ जणांचा मृत्यू झाला झाला आहे. यापैकी १८९ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे. तेरा रुग्णांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. सध्या कोविंड रुग्णालयात ३७ तर तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे २६ रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सतिश हरिदास व कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ शशिकांत देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय पवार यांनी दिली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image