Corona Breaking : उदगीरात चार वृद्धांचा कोरोनाने मृत्यू ; चोवीस तासात सव्वीस रूग्णांची वाढ

युवराज धोतरे 
Friday, 31 July 2020

येथील कोविंड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बसवेश्वर चौक  येथील एका ६५ वर्षीय,  डोनगेशेळकी (ता.उदगीर) येथील एका सत्तर वर्षीय, चौबारा रोड येथील ९० वर्षीय व्यक्तीचा तर नालंदा नगर येथील ७० वर्षेच व्यक्तीचा कोविडने मृत्यू झाला आहे. या चौघाच्या मृत्यूमुळे पुन्हा शहर व परिसरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली.

उदगीर (लातूर) : येथील कोरोना रुग्णालयात गुरूवारी (ता.३०) रोजी चार जणांना कोरोनाने मृत्यू झाला आहे. दोन दिवसात तब्बल २६ कोरोना बाधित रूणांची वाढ झाली असुन दिवसेंदिवस संसर्गाचा धोका वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना बळीमुळे उदगीर शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

येथील कोविंड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बसवेश्वर चौक  येथील एका ६५ वर्षीय,  डोनगेशेळकी (ता.उदगीर) येथील एका सत्तर वर्षीय, चौबारा रोड येथील ९० वर्षीय व्यक्तीचा तर नालंदा नगर येथील ७० वर्षेच व्यक्तीचा कोविडने मृत्यू झाला आहे. या चौघाच्या मृत्यूमुळे पुन्हा शहर व परिसरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!  

दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्युचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. येथील रुग्णालयात मुखेड, जळकोट, देवणी, अहमदपूर या भागातील रुग्ण दगावत असल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक बनले आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका   

बुधवारी (ता.२९) रोजी उशिरा आलेल्या अहवालात पुन्हा चौदा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात हडरगुळी २, नागलगाव १, देगलूर रोड ३, आर्यसमाज १, रेड्डी कॉलनी १, रेल्वे स्टेशन १, प्रिन्स लॉज १, आंबेडकर सोसायटी १, डोंगरशेळकी १ शास्त्री कॉलनी १अशा चौदा नवीन रूग्णाची नोंद झाली आहे.गुरूवारी (ता.३०} रोजी रात्री उशिरा आलेल्या अहवालात हिंदू खटीक गल्ली १ साईधाम १ सय्यद चांद दर्गा २, निडेबन १, भगीरथीनगर २, शिवनगर एसटी कॉलनी २, वाढवणा १, हरकरे नगर १, संत कबीरनगर १, सराफ लाईन १, विजयनगर १ अशा बारा रुग्णांची नोंद झाली आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

सद्या येथील कोरोना रुग्णालयात उदगीर ३१५, जळकोट ५, निलंगा २, अहमदपूर ६, मुंबई ३, चाकूर ४, हैदराबाद १, मुखेड ४, देवणी ६, बिदर १, पुणे १ अशा कोरोनाची बाधा झालेल्या ३४९ रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी 26 जणांचा मृत्यू झाला झाला आहे. यापैकी २०४ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे. बारा रुग्णांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

सध्या कोविंड रुग्णालयात ४४ तर तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे ३८ रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश हरिदास व कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

संपादन-प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgeer city corona update 4 death and 32 new corona patient