उदगीर प्रशासन हादरले; मोर्तळवाडीत ७९ पैकी २१ जणांना कोरोना, रुग्ण वाढण्याची भिती

युवराज धोतरे 
Wednesday, 2 September 2020

अवघ्या तेराशे लोकांची वाडी असलेल्या व फक्त ७९ लोकांची तपासणी केल्यानंतर २१ जणांना कोरोना आढळून आल्याने आरोग्य विभाग हादरले आहे.

उदगीर (लातूर) : मोर्तळवाडी (हाळी) ता.उदगीर येथे बुधवारी (ता.२) घेण्यात आलेल्या ॲटिंजेन तपासणी शिबिरात एकवीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरले आहे. अवघ्या तेराशे लोकांची वाडी असलेल्या व फक्त ७९ लोकांची तपासणी केल्यानंतर २१ जणांना कोरोना आढळून आल्याने आरोग्य विभाग हादरले आहे. ही माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी मोर्तळवाडीस भेट देऊन नागरिकांची संवाद साधला.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

बुधवारी मोर्तळवाडी येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील व डॉ. सवळे यांच्या पुढाकारातून एकूण एकूण ७९ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. पैकी एकवीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १,३५० लोकसंख्या असलेल्या या वाडीत विविध भागातील नागरिक असून या गावात एकाच दिवशी एकवीस जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व रुग्णांना  उदगीरच्या कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत कापसे यांनी दिली आहे.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

ही माहिती कळताच उदगीरचे उपजिल्हाधिकारी श्री मंगशेट्टी व तहसीलदार श्री मुंडे यांनी तात्काळ भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण मोर्तळवाडी गाव कंटेनमेंट झोन करण्याचे व दोनशे तीस कुटुंबातील एकूण तेराशे पन्नास नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी यांनी दिल्याचे यावेळी डॉ.कापसे यांनी सांगितले.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन  

दरम्यान तालुक्यातील मोर्तळवाडी (हाळी) व मोर्तळवाडी (नळगीर) या दोन्ही गावात बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथे उपजिल्हाधिकारी यांच्यासह भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे दोन्ही गावात परत एकदा शिबिर लावून तपासणी करण्यात येणार आहे व येथे वाढत असलेला संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचे तहसीलदार श्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.

(संपादन- प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgeer corona Update Mortalwadi 21 positive