
सकाळी नाष्टा व दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे. मात्र या रुग्णांना पिण्याचे पाणी, जेवणाची क्वालिटी, आणी ऑक्सिजचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या.त्याची दखल घेत तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांनी सोमवारी (ता.२७) थेट कोरोना वार्डात जाऊन तेथील रूग्णांची संवाद साधला व अडचणी जाणून घेतल्या.
उदगीर : येथील कोरोना रुग्णालयातील वार्डात स्वच्छता, पाण्याची व जेवणाची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेत तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांनी सोमवारी (ता.२७) थेट कोरोना वार्डात जाऊन तेथील रूग्णांची संवाद साधला व अडचणी जाणून घेतल्या.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज नवीन रुग्ण वार्डात दाखल होत आहेत. या रुग्णांना शासनाच्या वतीने मोफत जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी नाष्टा व दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे. मात्र या रुग्णांना पिण्याचे पाणी, जेवणाची क्वालिटी, आणी ऑक्सिजचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या.
कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक
देण्यात येणाऱ्या सुविधा या प्रत्यक्षात रुग्णांना मिळतात का? तक्रारीत किती सत्य आहे याची प्रत्यक्ष रुग्णांना भेटून तपासणी करण्यासाठी सोमवारी सायंकाळी तहसीलदार श्री मुंडे यांनी पीपीई किट परिधान करून उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
कोरोना वार्डातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संवाद साधून तेथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली. ज्या ज्या काही बाबी त्या ठिकाणी आढळल्या त्यासंदर्भात आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होईल व आवश्यक असलेल्या सुविधा सुरू होतील अशी माहिती तहसीलदार श्री मुंडे यांनी यावेळी दिली. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास, कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे, मंडळ अधिकारी शंकर जाधव आदी उपस्थित होते.
Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम
तीनशे रुपयाचे जेवण...
कोरोना वॉर्डातील रुग्णांना यापूर्वी आरोग्य विभागाच्या वतीने शंभर रूपयाचे जेवण देण्यात येत होते. मात्र ही रक्कम कमी असल्याने जेवणाची क्वालिटी खराब देण्यात येत होती. मात्र सध्या या रुग्णांना तीनशे रुपये दराचे जेवण देण्यात येत आहे. याची क्वालिटी मिळालीच पाहिजे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा श्री मुंडे यांनी संबंधितांना दिला आहे.
Edited by pratap awachar