Video : तृतीयपंथीयांना हवाय जगण्यासाठी आधार, टाळेबंदीचा फटका

Transgender Life, Udgir
Transgender Life, Udgir

उदगीर (जि. लातूर) : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीत गोरगरीब सामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच शहरातील तृतीयपंथीयांची ही मोठी अडचण झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील टाळेबंदीत यांना प्रशासन व स्वयंसेवी संस्थांचा आधार हवा असल्याचे तृतीयपंथीयांच्या गुरू अंजली उदगीरकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

या टाळेबंदीमध्ये देशातील मोठ्यात मोठ्या उद्योगपतीपासून ते लहानात लहान मजुरांपर्यंत व भीक मागणाऱ्या भिकाऱ्यापर्यंत अनेकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. यात अपवाद तृतीयपंथीसुद्धा राहिले नाहीत. दिवसभर बाजारात फिरून आपली पोटाची भूक भागविण्यासाठी फिरणाऱ्या या तृतीयपंथीयांना टाळेबंदीमुळे घरी बसावे लागले आहे. पहिल्या टप्प्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी कारवा ग्रुप स्वयंसेवी संस्थेला सोबत घेऊन या तृतीयपंथीयांना अन्नधान्याचे वाटप केले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी या तृतीयपंथीयांची दखल घेऊन त्यांनीही यांना अन्नधान्याचे साहित्य व मास्कचे वाटप केले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

उदगीर शहरासह परिसरातील गावागावांतून एकत्र आलेले हे तृतीयपंथीयांचे आधार व स्वस्त धान्याचे कार्ड हे गावाकडेच राहिले आहे. त्यामुळे त्यांना मिळणारे स्वस्त धान्य गावाकडे राहिल्याने टाळेबंदीमुळे गावी जाणे शक्य नसल्याने ते शहरातील बनशेळकी रोड परिसरात राहत आहेत. प्रशासनाने केलेल्या मदतीवर एवढे दिवस ते कसेबसे जगत आले आहेत. मात्र सध्या दुसऱ्या टप्प्यातील टाळेबंदीला सुरवात झाली असून दिलेले धान्य संपत आले असल्याने त्यांना पुन्हा अन्नधान्याची गरज निर्माण झाली आहे. या सर्व तृतीयपंथीयांची उपासमार होऊ नये, यासाठी प्रशासनाने व समाजातील विविध स्वयंसेवी संस्थांनी एक सामाजिक काम म्हणून व आम्ही समाजाचे घटक आहोत, असे समजून आम्हाला अन्नधान्य द्यावे व आम्हाला जगण्यासाठी आधार द्यावा, असे आवाहन तृतीयपंथीयांच्या वतीने श्रीमती उदगीरकर यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Udgir Transgender Want Livelihood, Corona Affect Their Lives Latur News CoronaVirus Covid19

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com