Corona update : उमरग्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू; बाधितांची संख्या ६८८ वर 

corona death.jpg
corona death.jpg

उमरगा : उमरगा शहर व ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी (ता.१४) दुपारी अन्टीजेन टेस्टमध्ये तीघे पॉझिटिव्ह आले. तर रात्री प्राप्त झालेल्या अहवालात आठ जण पॉझिटिव्ह आले. गेल्या ४७ दिवसात ६८० रुग्णसंख्या झाली आहे. त्यातील ३५५ जण कोरोनामूक्त झाले आहेत. दरम्यान शनिवारी (ता.१५) शहरातील सरकारी कोविड रुग्णालयात मुरूमच्या एका जेष्ठ नागरिकाचा तर उमरग्यातील एका महिलेचा खाजगी कोवीड रुग्णालयात मृत्यू झाला आहे. 

शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. गेल्या ४७ दिवसात ६८० रुग्ण संख्या झाली आहे. त्यात उमरगा शहरात ४२६ तर ग्रामीण मध्ये २५४ रूग्ण संख्या झाली आहे. आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यु झाला आहे. ३५५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. सध्या ३०४ जण उपचारासाठी दाखल आहेत. सर्वाधिक रूग्ण उमरग्यातील कोवीड रुग्णालयात दाखल असून शहरातील बहूजन विद्यार्थी वस्तीगृह, ईदगाह कोविड सेंटर, खाजगी कोविड रुग्णालय, मुरुम कोरोना केअर सेंटर यासह सोलापूर, उस्मानाबाद येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान शनिवारी उमरगा व मुरूम येथे घेतलेल्या ॲन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. तर ६५ जणांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

एकाच दिवशी दोघांचा मृत्यू
शनिवारी शहरातील सरकारी कोवीड रुग्णालयात मुरूमच्या एका जेष्ठ नागरिकाचा तर उमरग्यातील सोनार गल्ली येथील एका महिलेचा खाजगी कोविड रुग्णालयात मृत्यु झाला. दरम्यान कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. शिवाय गेल्या दोन महिन्यात ह्दयविकाराच्या झटक्याने अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागत असून पन्नाशी ओलांडलेल्या आणि अनेक व्याधीने त्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाविषयीची भिती निर्माण झाली आहे. 

संपादन-प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com