धक्कादायक! स्वतःच्या वडिलाला जिवंत जाळलं; मुलाला जन्मठेपेची शिक्षा

crime scene
crime scene

उमरगा (उस्मानाबाद): तालुक्यातील मुरूम गावात पोटच्या मुलाने अंगणात झोपलेल्या जन्मदात्या पित्याला जाळून ठार मारल्याप्रकरणी शुक्रवारी (ता.२९) अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. जिल्हा न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी आरोपी  मुलगा धनराज ढाले यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

याबाबतची माहिती अशी की, मुरूम येथील ख्याडे गल्लीतील मलकप्पा तोटप्पा ढाले वय ७० यांना मुलगा धनराज मलकप्पा ढाले हा गुढीपाडव्याच्या दिवसापासून वडिलोपार्जित असलेली शेती एक वर्ष कुणाला तरी लावून पैसे देण्याची मागणी करत होता. आई शांताबाई व वडिल मलकाप्पा यांच्यासोबत तो सतत भांडण करत होता. त्याच्या या मागणीला वडील मलकप्पा यांनी विरोध केल्यामुळे धनराज हा वडिलांना जाळून मारण्याची सतत धमकी देत होता.

३ एप्रिल २०१७ रोजी रात्री मलकप्पा ढाले हे आपल्या राहत्या घरी अंगणात बाजेवर झोपले होते. रात्री दोनच्या सुमारास मुलगा धनराज याने अंगावर रॉकेल ओतून वडिलाला जाळून मारले, आग भडकली आणि शेजारी असलेल्या कडब्याच्या गंजीने पेट घेतल्याने शेजारील नागरिक आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ करत होते. या आगीत मलकप्पा पूर्णपणे जळाले होते. आगीमुळे शेजारील लायक मुल्ला यांचे तीस हजार किमतीचा कडबा जाळून खाक झाला. तर बैल, जनावरे यातून बचावले होते.

रात्रीची वेळ असल्याने लोक घाबरले होते. तेथील काही तरुणांनी अग्निशमक व पोलिसांना माहिती दिली होती. या प्रकरणी शांताबाई ढाले यांच्या फिर्यादीवरून मुरूम पोलीस ठाण्यात धनराज ढाले यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. ए. मोमीन यांच्याकडे तपास दिला होता. श्री. मोमीन व तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक  बी. बी. गोबाडे यांनी दोषारोप पत्र दाखल केले होते.

याप्रकरणी सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले, त्यात वैद्यकिय अधिकारी डॉ. सत्यजित डूकरे, फिर्यादी शांताबाई ढाले, मलंग मासुलदार, सिराज फनेपुरे, जिंदावली सन्नाटे, प्रवीण गायकवाड यांचे साक्ष महत्वपूर्ण ठरली. याशिवाय प्रकरणात तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.खोडेवार, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बी. एम. भूमकर यांनीही पैरवी केली होती.

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी समोर आलेला पुरावा व शासकीय अभियोक्ता ॲड. संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत आरोपी धनराज मलकप्पा ढाले यास जन्मपेठ व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तर दुसऱ्या कलमानुसार पाच वर्ष शिक्षा व चार हजार रुपये दंड, दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com