धक्कादायक..! उमरगा आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा; पॉझिटिव्ह रुग्णाचा घरातच झाला मृत्यू..

अविनाश काळे
Tuesday, 21 July 2020

केसरजवळगा येथील ४८ वर्षीय एक व्यक्ती १९ जुलैला कोविड रुग्णालयात उपचारास दाखल झाल्यावर त्याचा स्वॅब नमुना घेवून तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. सोमवारी प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईकांच्या विनंतीवरून सोलापूर येथे रेफर करण्यात आले. मात्र नातेवाईकांनी खाजगी वाहनातून सोलापूरला न जाता त्या रुग्णास घराकडे घेऊन गेले. त्यात मंगळवारी पहाटे त्या रुग्णाच्या छातीत वेदना होत असल्याने खाजगी वाहनातून आलूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा वाटेत मृत्यू झाल्याने गावातच मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

उमरगा (जि. उस्मानाबाद) : शहरातील कोविड रुग्णालयातून रविवारी (ता. १९) तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या १७ स्वॅबचे अहवाल मंगळवारी (ता.२१) सकाळी प्राप्त झाले असून त्यात पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. एकाचा अहवाल अनिर्णित तर अकरा जण निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान केसरजवळगा येथील बाधित व्यक्तीचा घरात मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासनाच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

तालुक्यात मागील दोन दिवसात ३२ जण पॉझिटिव्ह आल्याने बाधितरुग्णांची संख्या १२६ झाली. शहरात ९२, तर ग्रामीण भागात ३४ रुग्ण झाले आहेत. मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पाच जण पॉझिटिव्ह आले असून शहरातील सानेगुरुजी नगर येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. ग्रामीण भागातील मूळज येथील एक दाळिंब येथील एक, भिकारसांगवी येथील एका युवकाचा समावेश आहे. दरम्यान सोमवारी सकाळी चक्क २५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

केसरजवळग्याच्या पॉझिटिव्ह रुग्णाचा घरात मृत्यू

केसरजवळगा येथील ४८ वर्षीय एक व्यक्ती १९ जुलैला कोविड रुग्णालयात उपचारास दाखल झाल्यावर त्याचा स्वॅब नमुना घेवून तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. सोमवारी प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईकांच्या विनंतीवरून सोलापूर येथे रेफर करण्यात आले. मात्र नातेवाईकांनी खाजगी वाहनातून सोलापूरला न जाता त्या रुग्णास घराकडे घेऊन गेले. त्यात मंगळवारी पहाटे त्या रुग्णाच्या छातीत वेदना होत असल्याने खाजगी वाहनातून आलूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा वाटेत मृत्यू झाल्याने गावातच मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

दरम्यान आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू झाल्याची चर्चा गावातून होत असून व्यक्ती कोविड रुग्णालयात दाखल असताना अहवाल येण्यापूर्वी रुग्णालय प्रशासनाने सोडले कसे? रेफर करायचे होते तर व्यक्तीच्या कुटुंबाची गरिब परिस्थिती पाहुन आरोग्य प्रशासनाने रुग्णवाहिकेची सोय का केली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

दरम्यानच्या काळात कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात गावातील अनेक व्यक्ती आल्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हे घडले असल्याची चर्चा ग्रामस्थ करीत आहेत. आलूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पेठकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली आणि पीपीई कीट्स उपलब्ध करुन दिल्यानंतर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता त्या व्यक्तीवर कब्रस्थानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान तालुक्यातील चिंचोली (जहागीर) येथील एका व्यक्तीचा कोविड रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला. कोविड नियमावलीनुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्याच्या स्वॅबचा अहवाल आणखी प्राप्त व्हायचा आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

" स्वॅब घेतल्यानंतर त्या व्यक्तीला सोलापूरला रेफर केले होते मात्र नातेवाईकांनी त्याला घरी घेऊन गेले. अहवाल मृत्युनंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजता आला.  रुग्णालयाची रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णास घेऊन गेल्याने विलंब होत होता. नातेवाईकांनी खाजगी वाहनात घेऊन जाण्याची तयारी केली होती. रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईकाचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 
- डॉ. अशोक बडे, वैद्यकिय अधिक्षक

(संपादन प्रताप अवचार)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga Death of a positive patient at home