उमरगा-लातूर बसला औसाजवळ अपघात ; दोन जखमी

जलील पठाण
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

औसा : शहरापासून हाकेच्या अंतरावर लातूर औसा रोडवर असलेल्या चंद्र लोकसमोर उमरगा-लातूर बसला अपघात होऊन दोन जण जखमी झाले आहेत. उमरगा येथून लातूरला जाणाऱ्या बस क्रमांक (एम एच २० बीएल१०१८) ला औशाजवळ सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पाठीमागून येणाऱ्या आयशर (एम.एच.१३ ए.एन.१४६७) ने पाठीमागून जोराची धडक दिली.

या अपघातात बसचे पाठीमागील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बसमधील राजेंद्र तुकाराम जाधव (वय. ४९ रा. बेलकुंड ता. औसा ) यांच्या तोंडाला मार लागल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय लातूर येथे हलविले. तर आयशर गाडीचा चालक राहूल शंकर चव्हाण (वय ३५ रा. अंजलीनगर, लातूर) यांचेवर औसा येथे उपचार चालू आहेत.

या घटनेची माहिती व फिर्याद उमरगा- लातूर बसचे चालक सुरवसे यांनी औसा पोलिसात फिर्याद दिली असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

Web Title: Umarga Latur bus accident Two injured near Oasa