उमरगा : कोजागिरी पोर्णिमेला दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोजकीच

उमरगा : कोजागिरी पोर्णिमेला दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोजकीच
उमरगा : कोजागिरी पोर्णिमेला दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोजकीचsakal

उमरगा (जि.उस्मानाबाद) : नवरात्र महोत्सवानंतर येणाऱ्या कोजागिरी पोर्णिमेनिमीत्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आंध्र, तेलंगणा व कर्नाटकातील पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी मोठी असते, मात्र गतवर्षापासुन सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे दर्शनासाठी नियमांची आडकाठी येत आहे. जिल्हाबंदीचे आदेश असल्याने दर्शनाला पायी जाण्याची प्रबळ इच्छाशक्ती असतानाही परराज्यातील भाविकांचा हिरमोड झाला आहे, मंगळवारी (ता.१९) कोजागिरी पोर्णिमा आहे मात्र रस्त्यावरून पायी जाणारे भाविक मोजकेच दिसत आहेत.

उमरगा : कोजागिरी पोर्णिमेला दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोजकीच
"हा काश्मीरींना बदनाम करण्याचा डाव"; फारूक अब्दूल्लांनी व्यक्त केली नाराजी

हातात परडी घेऊन आई राजा उदो उदो... चा जयघोष करीत हजारो भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांचे भरभरून चित्र सलग दोन वर्षापासून अगदी त्रोटक दिसत आहे. आंध्र, तेलंगणा व कर्नाटकातील अनेक भाविक श्रद्धेपोटी आणि नवस पूर्ततेसाठी नवरात्र महोत्सवात दर्शनासाठी जात असतात, शिवाय नवरात्रात होणारी गर्दी टाळण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षापासुन भाविक कोजागिरी पोर्णिमेनिमित्त दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढलेले चित्र होते. महामार्गावरील धार्मिक स्थळ, सभागृहात व सुरक्षित आडोश्याला भाविक रात्री मुक्कामाला असायचे. जवळपास दोनशे किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवास पूर्ण करणारे अगदी लहान मुलापासून तरुण व वयोवृद्ध नागरिक या पायी प्रवासात सहभागी झाल्याचे चित्र असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे चित्रच पालटले. गतवर्षी तर दर्शनच बंद होते, यंदा जिल्हाबंदीच्या आदेशाने कोजागिरी पोर्णिमेला दर्शनाला जाण्यासाठी मर्यादा आल्या. मंगळवारी कोजागिरी पौर्णिमा असताना गेल्या चार, पाच दिवस महामार्गावर भाविकाची संख्या मोजकीच दिसते आहे, रविवारीही असेच चित्र होते.

भाविकांसाठी अन्नदान नाष्ट्याची सोय !

परराज्यातील भाविकांनी तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी अन्नछत्र व नाष्टयाची सोय करण्यात येते मात्र यंदा कोरोनामुळे नियमांचे बंधन असल्याने मोजक्याच ठिकाणी भाविकांची सोय करण्यात आली आहे. शहरातील भारत विद्यालयासमोर तुळजाभवानी मित्र मंडळाच्या वतीने भाविकांना नाष्टा व चहा, पाण्याची सोय करण्यात आली होती. या उपक्रमासाठी जालिंदर सोनटक्के, नागेश सोमवंशी, दत्ता शिंदे, भास्कर मुळे, विनोद मुगळे, सतीश जगताप, मल्लू वागदरे, मल्लीनाथ बनसोडे, दत्ता परीट, विनोद कोराळे, पोपट सोमवंशी, रमण काळे आदींनी पुढाकार घेतला. दरम्यान उमरगा -चौरस्ता दरम्यान स्वामी विवेकानंद नवरात्र महोत्सवाच्या वतीने भाविकांसाठी भोजनाची सोय करण्यात आली होती. एम.ओ. पाटील, शरणाप्पा येळापूरे, महेश माशाळकर, शरणाप्पा व्हंडरे, श्रीशैल्य व्हंडरे, सोमनाथ बोळशेट्टी, नागेश दंडगे, अप्पू स्वामी, संजय येळापूरे, शिवशंकर व्हंडरे, प्रविण माशाळकर आदींनी यासाठी पुढाकार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com