वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार, चार जणांवर गुन्हा दाखल

अविनाश काळे
Tuesday, 6 October 2020

उत्तरप्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी एक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. वीटभट्टीवर काम करणार्या महिलेवर चार जणांनी आठ दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

उमरगा (उस्मानाबाद) : वीटभट्टीवर कामावर असलेल्या तीस वर्षीय महिलेला पळवून नेऊन आठवडाभर अत्याचार केल्याप्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.पाच) रात्री उशीरा अत्याचार व अॅट्रासिटी कायद्यान्वये चौघा तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अत्याचार करणारा विटभट्टी चालक व अन्य तिघे फरार असून पोलिस यंत्रणा आरोपीच्या शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

याबाबत पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, कर्नाटकातील झळकी (ता. बस्वकल्याण) येथील पारधी समाजातील एक कुटुंब लातूर मार्गालगत असलेल्या लक्ष्मी पाटी परिसरातील विटभट्टीवर काम करते. १९ सप्टेंबरला सलीम शानेदिवाण हा त्या महिलेच्या घरी आला, तुझ्या सोबत हा व्यक्ती कोण आहे असे म्हणाला, पिडीत महिलेने माझा भाऊ आहे असे म्हणत असताना सलीमने त्या महिलेला घरातून बाहेर आणले आणि लातूर मार्गे घेऊन गेले. आठवडाभर तिच्यावर अत्याचार करून २६ सप्टेंबरला सलिमने त्या पिडीत महिलेला आदम, पतराज व शहारूख यांच्या ताब्यात दिले. या तिघांनी त्या महिलेला कळंब पोलिस ठाण्याजवळ नेऊन सोडले. पिडीत महिलेने पोलिस ठाण्यात कैफियत मांडली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पोलिसांनी महिलेच्या आई-वडिलांना बोलावले. महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने आई-वडिलांनी मुलीला गावाकडे नेले. पिडीत महिलेने सोमवारी (ता. पाच) उमरगा पोलिस ठाण्यात येऊन संपूर्ण हकीगत सांगितली. या प्रकरणी सलीम शानेदिवाण, आदम, पतराज व शहारूख यांच्याविरूद्ध अत्याचार व अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विटभट्टीचालक कोरेगांववाडीचा रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांनी दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन- प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga rape case news Charges filed against four persons