
ग्रामपंचायतीच्या दप्तराची तसेच इतरही कामकाजाची तपासणी करण्याची मोहीम एका बड्या अधिकाऱ्याच्या आदेशाने सूरु झाली आहे. तपासणी करण्याबद्दल कोणाचीही तक्रार नाही. पण यामध्ये क्षुल्लक त्रुटी काढून त्यांना कारवाईची भिती दाखविण्यात येत आहे. कारवाई टाळायची असेल तर तडजोड शुल्क स्विकारुन त्याना सोडण्याचाही सल्ला दिला जात आहे.
उस्मानाबाद : ग्रामपंचायतीच्या तपासणीच्या नावावर ग्रामसेवक व सरपंच यांना धमकाविण्याचा प्रकार जिल्ह्यामध्ये सुरु झाला असून या विरोधात ग्रामसेवक व सरपंच दोन्ही घटक आक्रमक झाल्याचे दिसुन येत आहे. येत्या दोन दिवसात ते आंदोलनाच्या पावित्र्यात असून जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून असा प्रकार होत असल्याची भावना ग्रामसेवकांनी व्यक्त केली आहे.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
ग्रामपंचायतीच्या दप्तराची तसेच इतरही कामकाजाची तपासणी करण्याची मोहीम एका बड्या अधिकाऱ्याच्या आदेशाने सूरु झाली आहे. तपासणी करण्याबद्दल कोणाचीही तक्रार नाही. पण यामध्ये क्षुल्लक त्रुटी काढून त्यांना कारवाईची भिती दाखविण्यात येत आहे. कारवाई टाळायची असेल तर तडजोड शुल्क स्विकारुन त्याना सोडण्याचाही सल्ला दिला जात आहे. साहजिकच तपासणीच्या नावाखाली धमकाविण्याच्या प्रकाराचा जिल्ह्यातील ग्रामसेवक व सरपंचानी निषेध व्यक्त केला आहे. त्याविरोधात भूमिका घेऊन या प्रकार थांबविण्याची मागणी त्यानी केली आहे.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
सध्या कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये ग्रामसेवकांच्या समोर अनेक कामे असुन त्यात असा विनाकारण त्रास दिल्याने त्यांच्यातुन नाराजी व्यक्त होत आहे. वादग्रस्त अधिकाऱ्यांकडून असा प्रकार होत असल्याने जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात तक्रार देण्यास सांगितले आहे. त्यामुळे ग्रामसेवक मंडळी थेट जिल्हा परिषदेच्या समोर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेवर मोठी नामुष्कीची वेळ येणार असल्याचे चित्र आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
अशावेळी जनभावनेची कदर न करता एकतर्फी अधिकारशाही चालत असेल तर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे होते अशीही भावना ग्रामसेवक व सरपंचानी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत स्तरावर एखादी दुसरी त्रुटी आढळून येतेच पण त्याचा अर्थ तो भ्रष्ट कारभार असतो असे नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विरोधी गट असल्याने त्याच्यावर स्थानिक पातळीवर दबाव गट असतो. साहजिकच भ्रष्ट कारभार काढण्यासाठी तेच लोक पुढे येतात, पण या ठिकाणी तक्रारी नसताना फक्त स्वतःच्या फायद्यासाठी अशा तपासणी करणे अत्यंत चुकीचे असल्याचे मतही ग्रामसेवक व्यक्त करत आहेत.
Edited by pratap awachar