ऑरीक'मधील हाय टेन्शन लाईन होणार भूमिगत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कोरिडॉरच्या शेंद्रा नोड मधून पूर्व पश्‍चिम जाणारी 132 केव्हीची हाय टेन्शन लाईन आता भूमिगत केली जाणार आहे. या कामासाठी औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशीपने प्रस्ताव मागवले आहेत.

औरंगाबाद : दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कोरिडॉरच्या शेंद्रा नोडमधून पूर्व पश्‍चिम जाणारी 132 केव्हीची हाय टेन्शन लाईन आता भूमिगत केली जाणार आहे. या कामासाठी औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशीपने प्रस्ताव मागवले आहेत.

औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी अर्थात 'ऑरीक'मध्ये भूसंपादन करताना अस्तित्वात असलेली 132 केव्हीची हाय टेन्शन लाईन आता भूमिगत केली जाणार आहे. साधारण सहा ते सात किलोमीटर लांबीची ही लाईन डकट्‌स मध्ये अंथरण्यात येणार असून हे काम करण्यासाठी कंत्राटदार एजन्सीकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. शेंद्रा पंचतारांकित वसाहतीचा भाग असलेल्या पर्किन्स कंपनी लागत असलेले हाय टेंशन तारा तोलून धरणारे विजेचे टॉवर आता इथे इतिहासजमा होणार आहेत. 

आर्मड केबालचा वापर 
132 केव्हीच्या हाय टेन्शन तारा भूमिगत करताना विशिष्ट पद्धतीच्या केबालचा वापर केला जाणार आहे. आर्मड केबल यासाठी वापरले जाणारे असून पाण्यातूनही बिनधोक वीजपुरवठा करण्याची या तारेची क्षमता आहे. यासाठी डकट्‌समध्ये बेड कॉंक्रीट आणि वाळूचा वापर करून ते अंथरण्यात येणार असल्याची माहिती यासाठीच्या 'रिक्वेस्ट फॉर प्रपोजल' मध्ये देण्यात आली आहे. 

...म्हणून लाईन होणार भूमिगत 
हाय टेन्शन लाईन जिथून जाते तिथे आणि त्याच्या खालील भागात बांधकाम करण्यास मनाई असते. त्याशिवाय या लाईनच्या दोन्ही बाजूंनी विशिष्ट अंतरापर्यंत बांधकाम करता येत नाही. शिवाय या साईटमध्ये सर्व लाईन भूमिगत असल्याने ही पण लाईन भूमिगत करण्यात येणार आहे. "पर्किन्स पासून आरओबी 2' हे काम करून समृद्धी महामार्ग लगत ही लाईन परत हवेत उभारली जाणार आहे.

Web Title: Underground to make a high tension line