सावधान! शहरातील रस्त्यांवर  धावताहेत अनफिट स्कूल बस

सावधान! शहरातील रस्त्यांवर  धावताहेत अनफिट स्कूल बस

लातूर - तुमचा पाल्य किंवा तुमचा विद्यार्थी ज्या स्कूल बसमधून ये-जा करीत आहे ती स्कूल बस फिट आहे का, असेल तर त्याप्रकारचे फिटनेस सर्टिफिकेट (योग्यता प्रमाणपत्र) प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तुमच्या मुलाच्या स्कूल बसला दिले आहे का, याची पडताळणी करा. कारण असे प्रमाणपत्र न घेताच नियमांचे उल्लंघन करीत शहरात अनेक स्कूल बस धावताना दिसत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारपासून (ता. १७) सुरवात झाली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शालेय वाहनांची वर्दळ वाढायला सुरवात झाली आहे. त्यापैकी अनेक स्कूल बसने आरटीओकडून योग्यता प्रमाणपत्रच घेतले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्कूल बसचालक विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणून आता पालकांनी आणि शाळांनीच जागरूकता दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील म्हणाले, की शालेय प्रवास अधिक सुरक्षित वातावरणात व्हावा म्हणून दरवर्षी स्कूल बसची  पाहणी करून त्यांना योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. या पाहणीत बसची सध्याची स्थिती, परवाना, चालकाची सक्षमता, चालकावर गुन्हा नोंद आहे का, वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने त्यावर कारवाई झाली आहे का, अशा अनेक बाबी पाहिल्या जातात. यंदा काही स्कूल बसनी असे प्रमाणपत्र घेतले आहे; पण आणखीनही बऱ्याच स्कूल बस आहेत, ज्यांनी हे प्रमाणपत्र अद्याप घेतले नाही. त्यांना नोटिसाही बजाविण्यात आल्या होत्या. तरीही प्रमाणपत्र घेतले नाही, अशा स्कूलच्या विरोधात कारवाई करण्याची मोहीम आम्ही सुरू केली आहे.

नवीन स्कूल बस असेल तर दर दोन वर्षाला आणि आठ वर्षे पूर्ण केलेली स्कूल बस असेल तर दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसवर सध्या कडक कारवाई केली जात आहे. 
- अमर पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com