खड्ड्‌यात पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मरणार्थ महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या कमानीच्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २९) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. बांधकामाच्या ठिकाणी पालिकेने कुठलीही दक्षता घेतली नसल्यानेच हा अपघात झाला आहे.

अभिजित वसंतराव निकम (वय २७. रा. शिल पोखरी, अंबाजोगाई) असे या तरुणाचे नाव आहे. वीर भगतसिंह चौकात विलासराव देशमुख यांच्या नावाने कमान उभारण्याचे काम गेल्या दीड महिन्यांपासून पालिकेतर्फे सुरू आहे. येथील डांबरी रस्त्यावर पंधरा फुटांचे आठ खड्डे पाडले आहेत; पण अपघात होऊ नये म्हणून पालिकेतर्फे कसलीही सुरक्षा घेण्यात आली नाही. खड्ड्यांभोवती पत्रे बसविले नाहीत. शिवाय, येथे काम सुरू असल्याचे फलकही लावण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे, या भागात पथदिवेसुद्धा नाहीत. या अपघातानंतर जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने शनिवारी (ता. ३०) बेरिकेट्‌स लावून रस्ता इथला अडवला आहे.

निकम हे पारले बिस्किटाच्या कपंनीत नोकरीला होते. त्यांच्याकडे लातूर आणि सोलापूर जिल्हाचे नियोजन कंपनीने सोपविले होते. त्यामुळे ते लातूरमध्ये राहत होते. त्यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. कार्यालयातील काम आटोपून घराकडे जात असताना ते दुचाकीसह खड्डयात पडले. या अपघातात त्यांचा जागीचा मृत्यू झाला.

Web Title: the unfortunate death of the youth fall into the hole