जालन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिकात्मक गाढव मिरवणूक

उमेश वाघमारे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठा आरक्षणाची मागणी नैराश्येतून होत आहे, असे औरंगाबाद रविवारी (ता. 5) येथे प्रतिपादन केले होते. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या विधानाचा तीव्र निषेध होत आहे.

जालना : मराठा आरक्षणाची  मागणी ही नैराश्येतून होत, असल्याचे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची जालना येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी (ता. 6) प्रतिकात्मक गाढव मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गडकरी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन ही करण्यात आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठा आरक्षणाची मागणी नैराश्येतून होत आहे, असे औरंगाबाद रविवारी (ता. 5) येथे प्रतिपादन केले होते. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या विधानाचा तीव्र निषेध होत आहे.

जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या विधानाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते मुक्तेश्वरव्दार दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या फोटोचे पोश्टर गाढवाच्या पाठीवर टाकून प्रतीकात्मक गाढवावरुण मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन ही करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री यांच्या विरोधात घोषणा देते राजीनाम्याची मागणी केली.

जालना येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासोमर मागील सहा दिवसांपासून ठिय्या आंदोनल सुरु आहे. मागील दोन दिवसांपासून या ठिय्या आंदोनलस्थळी मुंडण आंदोलन सुरु आहे. मंगळवारी (ता. 6) मराठा समाज बांधवांनी मुंडण आंदोनल करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Union Minister Nitin Gadkaris symbolic donkey procession in Jalna