नाथाभाऊंनी थोड थांबायला पाहिजे होत

ravsaheb patil.jpg
ravsaheb patil.jpg

जालना : एकनाथ खडसे हे भाजपचे चांगले कार्यकर्ते होते. भाजपमध्येच त्यांची जडणघडण झाली. भाजपने त्यांना एक चेहरा दिला. त्यामुळे नाथाभाऊंनी थोडं थांबायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी (ता.21) जालना येथे दिली.


 भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केले. 

यावर केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांनी विचारणा केली असता ते म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडणे हे दुर्दैव आहे. भाजप पक्षात त्यांची जडणघडण झाली. त्यांना एक चेहरा दिला. त्यांच्या कुटुंबीयांना ही पक्षाने विविध पदावर त्यांना काम करण्याची संधी दिली.

ज्या पक्षाने त्यांच्यावर आरोप केले त्याच पक्षात ते जात आहे. त्यांच्यावर जे आरोप झाले, काही न्यायालयीन बाबी न्याय प्रविष्ट असून याचा निपटारा झाल्यानंतर पक्षाने त्यांना पुन्हा न्याय दिला असता. त्यमुळे नाथाभाऊंनी थोडं थांबायला पाहीजे होते, असे श्री. दानवे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com